मित्र

164

केतकी माटेगावकर

 तुझा मित्र..आशिष जोशी (माझा मामा)

 त्याच्यातली सकारात्मक गोष्ट..खूप प्रेमळ,संवेदनशील, सतत लोकांची मदत करण्याचा त्याचा स्वभाव. मी त्याला माझी प्रत्येक गोष्ट सांगते.

त्याच्यातली खटकणारी गोष्ट ..तो खूप काळजी करतो.

त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..मी काहीही न बोलता त्याला कळतं मला काय हवंय. आतापर्यंत त्याने बऱयाच वस्तू अशाच मला अशाच पद्धतीने वस्तू दिल्या आहेत. मला जरबेराची फुलं खूप आवडतात. त्याने ती फुलं एकदा माझ्यासाठी आणली. त्याला कसं कळलं ती फुलं मला आवडतात ते माहीत नाही.

त्याच्याकडून काय शिकलात ?..ऑलवेज बिलिव्ह बट नेव्हर ट्रस्ट’ ही गोष्ट मी त्याच्याकडून शिकले. तसेच तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुमच्यातलं लहान मुल जिवंत राहायला हवं हेही शिकले.

त्याचा आवडता पदार्थ..चिकन

तो निराश असते तेव्हा..तो पहिल्यांदा माझ्याशी बोलतो.

 एकमेकांसाठी वेळ देता का ?..रोज बोलतो. मेसेज करतो. काहीही एवढसं जरी झालं तरी मी त्याला फोन करून सांगते.

 दोघांचे भेटण्याचे ठिकाण..त्याच्या किंवा माझ्या घरी, फिनिक्स मॉल

त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण..मी त्याच्याबरोबर असते तेव्हाचे सर्व  क्षण अविस्मरणीयच असतात.

 तू चुकतेस तेव्हा तो काय करते ..खूप रागावतो, चिडतो, ओरडतो.

भांडण झाल्यावर काय करता ?..आम्ही प्रचंड भांडतो. त्यानंतर तो खूप लाड करतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?..आम्हा दोघांनाही येतो, कारण आमचे दोघांचेही स्वभाव सारखे आहेत. मी बोलणं बंद करते.

 त्याचं वर्णन..तो माझा मामा, मित्र, मार्गदर्शक आहे. त्याचं वर्णन मी करू शकत नाही, कारण माझ्या आयुष्यात त्याचं खूपच महत्त्वाचं स्थान आहे. आईबाबांएवढाच मला तो महत्त्वाचा असून माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. आम्ही एकमेकांबाबत खूप पझेसिव्ह आहोत.  तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही देत राहणं गरजेच आहे. आत्मविश्वास आणि भावनिक सहाय्याची मला सतत गरज असते. मोठी व्यक्ति आणि मित्र म्हणून त्याने मला नेहमी या दोन्ही गोष्टी दिल्या आहेत.

तुझी एखादी त्याला आवडणारी सवय..माझं खूप विचार करणं त्याला आवडत नाही. आम्ही एकमेकांना सांगतो, ‘अरे इतना मत सोच’

तुमच्या दृष्टिने मैत्रिची व्याख्या ?..खरी मैत्री तिच जिला व्याख्या नसेल. शब्दांच्या पलीकडे, शब्दातीत असली पाहिजे ती मैत्री.

 तुम्हाला तो कसा हसवतो ?.. मला कळतही नाही मी कधी हसायला लागले. त्याचा ऑराच खूप सकारात्मक आहे. तो आणि त्याची बायको माझे खूप फोटो काढतात.

एकत्र पाहिलेला नाटक/ सिनेमा ? ..एकही नाही, पण आमच्या आवडीनिवडी सारख्या आहेत.

त्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली ?..मैत्री झाली. मी लहान असल्यापासून त्याने मला पाहिलंय, सांभाळलंय. तो आपल्याविषयी कोणाला  काही सांगणार नाही याची खात्री वाटली आणि ही मैत्री वाढत गेली.

आपली प्रतिक्रिया द्या