सखा

80

आदिती सारंगधर

तुमचा मित्र सुहास रेवंडेकर

त्याच्यातली सकारात्मक गोष्ट खूप सहनशील आहे. त्याची निर्णयक्षमता चांगली आहे.

त्याच्यातली खटकणारी गोष्ट तो खूप विसरतो.

त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट मला आता झालेला मुलगा.

त्याच्याकडून काय शिकलात ?- जेव्हा तुम्ही खूप चिडलेले, रागावलेले, खूश किंवा दुःख़ी असता तेव्हा प्रतिक्रिया द्यायची
नाही.

त्याचा आवडता पदार्थ? – सर्व शाकाहारी पदार्थ

तो निराश असतो तेव्हा? – कोणाशीही बोलत नाही.

एकमेकांसाठी वेळ देता का? – हो

दोघांचे भेटण्याचे ठिकाण? – घरी

त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण? – ज्या दिवशी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तो क्षण.

तू चुकतेस तेव्हा तो काय करतो? – चूक झाल्यानंतर जेव्हा मी चांगल्या मूडमध्ये असते तेव्हा मी कुठे चुकले याची जाणीव करून देतो.

भांडण झाल्यावर काय करता ?- खूप भांडतो. एकमेकांशी बोलत नाही. 

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ? – मला सतत येत असतो.

त्याचं वर्णन – तो खूप हुशार आहे. इंजिनीयर आहे. चांगली प्रोजेक्ट त्याच्या हातून घडली आहेत.

तुमची एखादी त्याला आवडणारी सवय सतत चिडचिड करते, एकेका क्षणाला निर्णय बदलते.

तुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या जिथे तुम्ही फक्त तुम्हीच असता. त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला दुसरं व्यक्तिमत्त्व पांघरून राहावं लागत नाही.

तुम्हाला कसा हसवतो? – तो कॉमेडी चांगली करू शकतो. त्याचा हा गुण मला आवडतो. प्रत्येकवेळी त्याने मला हसवावं अशी माझी अपेक्षा नसते.

एकत्र पाहिलेलं नाटक ? – तसं तर आम्हाला एकमेकांना कामामुळे एकत्र नाटक पाहायला वेळ नसतो, पण ‘सही रे सही’ पाहिलेलं आठवतंय.

एकत्र फिरायला जायचे ठिकाण? – लोणावळ्याला कॅफे कॉफी डेमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. नंतर लग्नाची मागणीही मला त्याने तिकडेच घातली. त्या ठिकाणी जायला आम्हाला आवडतं.

आपली प्रतिक्रिया द्या