मैत्रीण

65

राजन भिसे

तुमची मैत्रीण डॉ. मंगल केंकरे

तिच्यातली सकारात्मक गोष्ट ती सगळय़ांना मदत करते.

तिच्यातली खटकणारी गोष्ट ती कोणाचंही ऐकत नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे वागते. एखादी गोष्ट तिने ठरवली आणि आपण तिला सल्ला दिला तर ती न ऐकता स्वतःच्या मनाप्रमाणे करते.

तिच्यातली आवडणारी गोष्टसगळय़ांना मदत करण्याची वृत्ती. कोणी आजारी असेल तर त्याची ती विशेष काळजी घेते.

तिच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट – विशेष काही नाही.

तिच्याकडून काय शिकलात दुसऱयांना मदत करावी. निरपेक्ष आणि निःस्वार्थ बुद्धीने मदत करणे हा तिचा गुण आहे. हे शिकण्यासारखं आहे.

तिचा आवडता पदार्थ बोंबलाचं कालवण आणि भात.

ती निराश असते तेव्हा काय करते? – रडते.

तिच्यासोबतचा एखादा अविस्मरणीय क्षण विशेष असा नाही.

तुम्ही चुकता तेव्हा ती काय करते? – मला खूप बोलते.

भांडण झाल्यावर काय करता? – खूप कडाकडा भांडतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो? – मला.

तिचं वर्णन ती खूप हुशार आहे. तिने विज्ञानातील डर्मेटॉलॉजी या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे.

 तुमची एखादी तिला न आवडणारी सवय माझा आळशीपणा तिला अजिबात आवडत नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या