जिवलग मैत्रिणी निघाल्या बहिणी, 17 वर्षानंतर झाला उलगडा

एका चित्रपटाला शोभेल अशा घटना खर्‍या आयुष्यातही होत असतात. दोन जिवलग मैत्रिणी बहिणी असल्याचे समोर आले आहे. डीएनए टेस्टमध्ये हे निष्पण्ण झाले आहे.

अमेरिकेतल्या पेनिसिल्विनियामध्ये ऍश्ले थॉमस आणि टोया विंबरली या दोन जिवलग मैत्रीणी आहेत. दोघींची पहिली ओळख शाळेत सहव्या इयत्तेत झाली होती. तेव्हा पासून त्यांची मैत्री सुरू झाली. अनेकवेळा दोघींना काहींनी सांगितले की तुम्ही दोघी सारख्या दिसता तुम्ही बहिणी आहात का? दोघींनी अनेकवेळा हे हसण्यावारी नेले.

ऍश्ले थॉमसच्या आईचे निधन झाले होते. नुकतंच तिच्या आईची एक मैत्रीण फेसबुकवर फोटो पाहत होती. तेव्हा तिने टोयाच्या वडिलांना पाहिले. तिला आठवले की टोयाचे वडील आणि ऍश्लेची आई कधी काळी एकत्र होते. टोयाचे वडीलच ऍश्लेचे वडील असू शकतात अशी दाट शंका ऍश्लेच्या कुटुबीयांना आली. म्हणून त्यांनी डीएनए टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. ऍश्लेच्या कुटुंबीयांचा संशय खरा ठरला. टोयाचे वडीलच ऍश्लेचे वडील निघाले.

यामुळे आमचे नाते अजून घट्ट झाल्याची प्रतिक्रिया टोयाने दिली.तसेच आपण यामुळे अजून आनंदी असल्याची पोस्टही तिने फेसबुकवर शेअर केली.

आपली प्रतिक्रिया द्या