महाराष्ट्रातील फिजिओथेरपिस्ट ठरले सर्वोत्कृष्ट

सामना ऑनलाईन । मुंबई

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टच्या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रातील फिजिओथेरपिस्ट अव्वल  ठरले आहेत. छत्तीसगडच्या आयईपी शाखेला तसेच त्यांच्या महिला सेलने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला सर्वोत्कृष्ट फिजिओथेरपिस्ट शाखा म्हणून गौरविण्यात आले. आयईपी छत्तीसगडचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चक्रवर्ती यांना फिजिओथेरपिस्ट चिकित्सा क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘सिग्निफिकंट कॉण्ट्रिब्युशन’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या परिषदेत 1500 हून अधिक फिजिओथेरपिस्ट सहभागी झाले होते. यावेळी फिजिओथेरपीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबतही माहिती देण्यात आली. आयएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव झा यांनी  लोकांचा कल फिजिओथेरपीकडे वाढत असून या दृष्टीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.