बेस्टची नवरात्रीनिमित्त विशेष बस सेवा

प्रातिनिधीक फोटो

परळ-लालबागमधील भाविकांसाठी महालक्ष्मी मंदिरापर्यंत खास बससेवा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परळ-लालबागमधील भाविकांना महालक्ष्मी मातेचे दर्शन घेता यावे यासाठी शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यान ते महालक्ष्मी मंदिर असा बसमार्ग सुरू करण्यात आला. या बसमार्ग क्रमांक ८१२ चे उद्घाटन आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

ही बससेवा सकाळी सात ते रात्री साडेअकरा यावेळेत सुरू राहणार आहे. बसमार्ग शिवडी-परेल व्हीलेज-के.ई.एम हॉस्पिटल-गांधी हॉस्पिटल-भारतमाता-लालबाग-गणेश टॉकीज-आर्थर रोड नाका-सातरस्ता-महालक्ष्मी रेल्वे स्थानक-रेसकोर्स-हाजीअली-महालक्ष्मी मंदिर असा असणार आहे. यावेळी बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, महिला बालकल्याण अध्यक्षा सिंधु मसुरकर, उपविभागप्रमुख भारत म्हाडगुत, शाखाप्रमुख किरण तावडे, शिवडी विधानसभा ग्राहक संरक्षण कक्षाचे बबन सकपाळ, महिला शाखा संघटक कांचन परब, युवासेना शाखा अधिकारी रोहीत पाटेकर, उपशाखाप्रमुख कारखानीस, प्रितेश सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊ सावंत, बेस्टच्या वाहतुक विभागाचे आगार व्यवस्थापक भोर आणि विभागातील नागरिक उपस्थित होते.