बेस्ट कर्मचार्‍यांना मेमो, कामावर हजर व्हा!

2480
best-2
प्रातिनिधिक फोटो

मुंबईची लाइफलाइन बेस्ट अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी गरजेचे असल्याने आता बेस्टच्या कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्यासाठी बेस्ट प्रशासनाने मेमो पाठविण्यास सुरूवात केली आहे. 21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांनी त्वरीत हजर व्हावे असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबईत कोनोरा साथीचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असताना लोकलनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेस्टला सुरळीत चालविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अनेक कर्मचार्‍यांनी 21 मार्चपासून दांड्या मारण्यास सुरूवात केली असल्याने बेस्टकडे कर्मचार्‍यांची टंचाई निर्माण झाली आहे. बेस्टकडे स्वताच्या मालकीच्या तीन हजार गाड्या असून त्यांना महत्वाच्या हॉस्पिटल आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठी निरंतर चालवित ठेवणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे जे बेस्ट कर्मचारी गावाला गेले आहेत. त्यांनी देखील मामलेदाराचा प्रवासाचा दाखला घेऊन मुंबईत हजर व्हावे असे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गजन्य साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने एकीकडे 14 एप्रिलपर्यंत असलेले लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्याने बेस्ट हाच एकमेव अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी पर्याय उरला आहे. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आरोग्य सेवा, महापालिका, र्बँक, बेस्ट आणि तातडीच्या सेवा पुरविण्यार्‍या घटकांसाठी प्रवासी सेवा देणे अतिशय गरजेचे आहे. तसेच बेस्टही अत्यावश्यक सेवेत अंतर्भूत आहे. त्यामुळे 21 मार्च ते 4 एप्रिल या काळात घरी बसलेल्या  किंवा गावी गेलेल्या बेस्ट कर्मचार्‍यांना कामावर येण्यासाठी मेमो देण्यात आला असल्याचे बेस्ट कामागार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या