डॉक्टरलाही करावी लागली वणवण; सेवा देणाऱ्या रुग्णालयातही जागा मिळाली नाही

देशात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयात जागा मिळवण्यासाठी रुग्णांना वणवण करावी लागत आहे. मात्र, उपचारासाठी डॉक्टरलाही वणवण करावी लागली आहे. ज्या रग्णालयात सेवा बजावली, त्या रुग्णालयातही त्यांना जागा मिळाली नाही. ही घटना बिहारमध्ये घडली आहे.

ज्या रुग्णालयांत रात्रंदिवस कोरोना रुग्णांवर उपचार केले, तहानभूक विसरुन रुग्णांची सेवा केली. सेवा बजावताना जीवाचीही पर्वा केली नाही अशा डॉक्टरला स्वत:च्या उपचारासाठी रुग्णालयात जागा मिळेनाशी झाली आहे. डॉक्टरची ही अवस्था आहे तर सामान्य रुग्णाची काय अवस्था असेल याचा विचारही करता येत नाही.

ही घटना बेतिया येथील नरकटियागंजच्या अनुमंडल रुग्णालयातील आहे. राजीव कुमार पांडे असे या डॉक्टरचे नाव आहे. राजीव हे अनुमंडल रुग्णालयात कोवि़ड रुग्णांवर उपचार करत होते. रुग्णालयात आयसोलेशन विभागात ड्युटी करत असताना 4 मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टर राजीव होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र 6 मेला त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि त्यांची तब्येत बिघडली.

राजीवचे वडिल आणि बायको डॉक्टरांना घेऊन रुग्णालयात पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. रुग्णालयात डॉक्टर राजीव यांना बघायलाही कोणी आले नाही. साधी दखलही कोणी घेतली नाही. त्यांची पत्नी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी, कोरोनाची चाचणी करण्यासाठी विनवण्या करत होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

एक आठवड्यापूर्वी रुग्णांची सेवा करताना त्यांना कोरोनाची लागण झाली. आता त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय मात्र कोणी त्यांना बघायचीही तसदी घेत नाही. एका डॉक्टरची ही अवस्था आहे तर सामान्य रुग्णांची काय अवस्था असेल असे डॉक्टरांचे नातेवाईक तरुण चौबे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या