सरसंघचालक भागवत म्हणतात, आपसातील भांडणामुळे दोघांचेही नुकसान!

969

आपापसात भांडल्याने दोघांचेही नुकसान होते हे सर्वच जाणतात. परंतु हे माहिती असूनही माणूस जे करायला पाहिजे ते न करता जे करायला नको तेच करतो, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेव संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

भीतीमुळे माणूस बोलताना नको ते बोलतो आणि करताना नको तेच करतो. लिजेंड व्यक्तीला सुद्धा विनयशील व्हावेच लागते. अहंकारामुळे कोणी कोणाशी बोलायला तयार नाही. भौतिक जगात अहंकारामुळे माणूस विचार करू शकत नाही. मी आणि माझ्या पलिकडे जाऊन विचार करीत नाही. मात्र शिक्षणामुळे हा विवेक येतो, असे ते म्हणाले. राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय संदर्भ शोधले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या