धर्मरक्षणासाठी,समाजहितासाठी भय्यूजींनी केला आर्थिक संकटाशी मुकाबला

22

सामना ऑनलाईन, इंदूर

धर्मातील अधर्माशी लढणाऱ्या आणि धर्माच्या बाजारीकरणावर कडाडून टीका करणाऱ्या भय्यूजी महाराज यांना मानणारा संपूर्ण देशभरात मोठा वर्ग होता. मात्र धर्म आणि आध्यात्मातील वाढत्या बाजारीकरणामुळे भय्यूजी प्रचंड निराश झाले होते. या नैराश्यामुळे त्यांना सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी  लोकांना भेटणं कमी केलं होतं.

शेतकरी आणि गरीबांच्या भल्यासाठी भय्यूजींनी महाराष्ट्रात प्रचंड काम केलं होतं. जलसंधारणासाठीही त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. या कामासाठी त्यांनी स्वत:कडचाही बराच पैसा खर्च केल्याचं सांगण्यात येतंय. हे कार्य अविरत सुरू रहावं यासाठी त्यांनी कर्ज देखील उचललं होतं. कर्ज देणाऱ्यांनी त्यांच्या घरी पैश्यांसाठी तगादा लावायला सुरूवात केली होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावाने ठेवलेली एफडी मोडली होती, आणि काही जणांची देणी चुकवली होती. एकवेळ अशी आली होती की भय्यू महाराजांकडे पुण्याला जाण्यासाठीही पैसे नव्हते. लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या, त्यांच्या भल्यासाठी कर्ज घेऊन पैसे खर्च करणाऱ्या भैय्यू महाराजांच्या निधनाने त्यांच्यामुळे भलं झालेल्या असंख्य सामान्य नागरिकांना प्रचंड धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या