टेस्टी भजी न बनविल्याने नावं ठेवली, नवऱ्याला हिंस्त्र पद्धतीने ठार मारलं

1574
प्रातिनिधिक फोटो

गुजरातमधल्या दाहोद तालुक्यातील वडभरा गावातील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिचा नवरा बाडूभाई मिनामा याचा हिंस्त्र पद्धतीने खून करण्यात आला होता. त्याच्या हत्येप्रकरणी त्याची बायको रमिला (वय 35 वर्षे) हिला अटक करण्यात आली आहे. रमिलाने बाडूभाईच्या डोकं पहिले दगडाने ठेचलं होतं आणि नंतर धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर असंख्य वार केले होते. अतिरक्तस्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

Photo- बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत ‘राजकन्या’

रमिला आणि बाडूभाई यांचं 15 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. या दोघांना 3 मुलं आहेत. नवरा-बायकोतील भांडणं प्रत्येक घरात होता. मात्र किरकोळ वादाचं पर्यवसान खुनामध्ये होईल असं वडभरा गावातील लोकांना कधीच वाटलं नव्हतं. या सगळ्या वादाची सुरुवात भज्यांवरून झाली होती.

आकाशात दोन विमानांची टक्कर, खासदारासह सात जणांचा मृत्यू

बाडूभाई हा रमिलाला जेवणात भजी बनवत नसल्याबद्दल ओरडला होता. रमिलाने रात्रीच्या जेवणात भजी बनवायचं ठरवलं होतं, आणि त्यानुसार तिने बनवली देखील. बाडूभाईला तिने बनवलेली भजी आवडली नाही त्याने भज्यांना नावं ठेवत रमिलाला टोमणे मारले. यामुळे रमिला भयंकर संतापली होती. रमिलाने नवऱ्याला धडा शिकवायचं मनापासून ठरवलं होतं.

बाडूभाई झोपलेला असताना रमिलाने जड दगड घेतला आणि त्याने बाडूभाईच्या डोक्यावर वार केले. यानंतर तिने कात्रीसारखी धारदार वस्तू घेतली आणि त्याने गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या बाडूभाईचा अतिरक्त रक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला. बाडूभाईच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि रमिलाला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या