भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामध्ये शेतीच्या वादातून वडिलांनीच मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून रागाच्या भरात वडिलांनी मुलाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रोंघा गावात ही घटना घडली आहे. धनराज ठाकरे (वय – 70) असे आरोपीचे, तर एकनाथ ठाकरे (वय – 40) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
धनराज ठाकरे यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बाप-लेकामध्ये शेतजमिनीवरून वाद सुरू होता. शनिवारी दुपारी यात वादातून दोघांमध्ये खडाजंगी झाली. वाद विकोपाला गेल्याने वडिलांनी कुऱ्हाडीचे घाव मुलाच्या मानेवर घातले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
आधी पतीला नोकरी मिळवून दिली मग कामावर पाठवले; पुढे जे घडले ते ऐकून पोलीसही चक्रावले!
दरम्यान, धनराज ठाकरे शेतात काम करतात. तर त्यांचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. लहान मुलगा हा मुंबईत नोकरी करतो. वडील धनराज आणि मोठा मुलगा एकनाथ यांच्यात संपत्तीवरून वाद होते. शनिवारी एकनाथ शेतीचे काम करत असताना धनराज यांनी पाठीमागून येऊन त्याच्यावर वार केले. याची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
बलात्कार केला, हत्या केली आणि निघून गेला; पण हेडफोनने घात केला!