भंडाऱ्यात महिलांसाठी आयोजित पेटी वाटप कार्यक्रमात झुंबड उडाल्याने महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत भाजप मिंधे सरकारला फटकारले आहे. यात लाठीचारात सहा ते सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
महाभ्रष्टयुती सरकार, लाडकी बहीण आता तुम्हाला माफ करणार नाही!
गरीब महिलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा उडवण्याचं काम महाभ्रष्टयुती सरकार करत आहे. हा तुमच्या खिशातला नाही तर, जनतेचा पैसा आहे.
भंडाऱ्यात लाडक्या बहिणींवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. विशेष म्हणजे हा सगळा… pic.twitter.com/QpoqlG1Z5u
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 30, 2024