Bhandara News : B.T.B असोसिएशनच्या मनमानी कारभाराने शेतकरी संतप्त, नगरपरिषदेवर काढला रेडा मोर्चा

भंडारा जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईमध्ये सुरू असेलेल्या B.T.B असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत हल्ल्या (रेडा) मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी रेडे घेऊन उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले मंडईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून B.T.B असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. अखेर आज संतापाचे रुपांतर आंदोलनात झाले आणि शेतकऱ्यांनी भंडारा नगरपरिषदेवर हल्ल्या (रेडा) मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी B.T.B असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेली अवैध वसुली बंद करावी, तसेच शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करून टाकेन, अशी धमकी देणाऱ्या न.प. भंडारा यांचा निषेध करण्याता आला. यावेळी शेतकऱ्यांनी रेडे रंगवून आणले होते. एका रेड्यावर नगर परिषद मुख्य आधिकारी भगवान बानकर यांचे नाव होते, तर दुसऱ्या रेड्यावर B.T.B च्या संजय कुंभलकर यांचे नाव होते. तसेच इतर रेड्यांवर सुद्धा अधिकाऱ्यांची नावे टाकून शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला.