अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षण उपवर्गीकरणच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भंडारा जिल्ह्यात कडकडीत बंद पाडण्यात आला. या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून लाखनी, साकोली ,लाखांदूर, तुमसर या सगळ्या तालुक्यांमध्ये सुद्धा शाळा महाविद्यालये आणि संपूर्ण बाजारपेठ बंद होत्या.
विविध सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनेने या बंदमध्ये सहभाग घेतला होता. सर्वो्च्च न्यायालयानं त्यांचा निर्णय मागे घ्यावा अशी आंदोलकांची भूमिका होती. विविध संघटनांनी एकत्रित येत शास्त्री चौकातून मोर्चाला सुरुवात केली यामध्ये भंते, समता सैनिक दल, महिला , पुरुष, तरुण वर्ग यांचा समावेश होता.
शास्त्री चौकातून शांततेत काढलेली ही रॅली त्रिमूर्ती चौकात आल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.