मांजरीतील भारत बायोटेकच्या लस निर्मितीसाठी ड्रग कंट्रोलरकडे अर्ज

bharat-biotech-covaxin

पुण्यातील मांजरी येथे ‘भारत बायोटेक’ या कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसींचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. या कंपनीच्या वतीने लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) अंतिम परवान्यासाठी अर्ज केला आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर त्वरित उत्पादन सुरू केले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारत बायोटेकच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष भेट देऊन आढावा बैठक घेतली. राज्य शासनाने भारत बायोटेक पंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे.