भारत पेट्रोलियम स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

स्थानीय लोकाधिकार समितीचे महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर महासंघाचे कार्याध्यक्ष शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघ सरचिटणीस शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने भारत पेट्रोलियम स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अध्यक्षपदी प्रदीप मयेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी धनलक्ष्मी पेंकरे, किशोर कांबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरचिटणीपदी अरविंद महाडिक, खजिनदार सद्गुरू गावडे यांची नियुक्ती केली आहे. तर चिटणीसपदी हेमंत कदम, शंकर ओगले, कांचन भोईर, हेमंत पराडकर, मनीष नार्वेकर, रणजित पंडित, प्रवीण शिरोडकर, चंद्रविलास घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्यकारिणी सदस्यपदी अनिल सुर्वे, सुनील म्हामुणकर, लहू धुरी, शाम पाटील, शशिकांत चव्हाण, विलास विचारे, किशोर समजे, शांताराम गोनबरे, जनार्दन काळे, रमेश पाटील, हेमंत ढगे, पराग मांडविकर, दत्ता येवले, मधुकर रेवाळे, संध्या अतुल पाटील यांची नियुक्ती केल्याचे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या