देव माझा

96

देव म्हणजे सकारात्मकता, विश्वास आणि श्रद्धा सांगतेय भार्गवी चिरमुले

देव म्हणजे ? – सकारात्मकता आणि विश्वास या दोन गोष्टीत मी देवाला मानते.

आवडते दैवत ? – गणपती, कोल्हापूरची अंबाबाई आणि स्वामी समर्थ

धार्मिक स्थळ? – कोल्हापूरचं अंबाबाईचं देऊळ

आवडती प्रार्थना – पसायदान

आवडते देवाचं गाणं ? – प्रथम तुला वंदितो…

धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का ? – भगवद्गीता

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का ? – चमत्कारांपेक्षा जे घडतं त्याच्यावर विश्वास आहे.

शुभ रंग ? – निळ्या आणि हिरव्या रंगांचं मला आकर्षण आहे.

एखादी अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – एखाद्याला मनापासून मदत केली आणि आम्ही केलेल्या कामामुळे लोकांच्या चेहऱयावर हसू येतं तेव्हा मला समाधान मिळतं.

देवावर किती विश्वास आहे ? – श्रद्धा आहे.

दुःखी असतेस तेव्हा ? – काम करते; कारण कामामुळे आपण दुःख, संकट विसरतो.

नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील ? – ते त्यांच्या आणि आपण आपल्या विश्वासावर जगत असतो.

देवभक्त असावं पण देवभोळं नसावं.. तुमचं मत काय ? – मी अंधश्रद्धेच्या बाबतीत देवभोळी नाही. वाईट कामांना घाबरते.

इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का ?- नाही.

ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास आहे ? – गाईडलाईन म्हणून वापरावे. आहारी किती जायचं हे आपल्यावर अवलंबून आहे.

उपवास करता का – माझ्या समाधानासाठी करते.

अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता ? – कोणतंही  काम करणं ही देवाची भक्तीच आहे.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना ? – मला मूर्तिपूजा आवडते. यामुळे समाधान मिळतं.

आपली प्रतिक्रिया द्या