महाराष्ट्र बंद मागे घेतला!: प्रकाश आंबेडकर

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा कोरेगावमधील हिंसेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेत असल्याची घोषणा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. बंदला समविचारींचा पाठिंबा मिळाला, काही हिंसक घटना वगळता बंद यशस्वी झाला; असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Live अपडेट

भीमा कोरेगावमधील हिंसेप्रकरणी शिवराज प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सरकारने अटक करावी. जो न्याय याकुब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्र बंद दरम्यान मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्यात आली. एसटी तसेच विविध शहरांमध्ये बसगाड्या आणि अनेक खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही रेल्वे स्टेशनांवर आंदोलकांनी तोडफोड केली. दगडफेकीच्या घटना घडल्या. गुजरीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या संरक्षणासाठी कडे केले.

आपली प्रतिक्रिया द्या