…तर कर्जबाजारी भारती एअरटेल परदेशी कंपनी बनेल

273

भारती एअरटेलची प्रमोटर असलेल्या भारती टेलिकॉम या कंपनीने 4,900 कोटी रुपये थेट परदेशी गुंतवणूकीतून (एफडीआय) उभे करण्यासाठी दूरसंचार विभागाकडे परवानगी मागितली आहे. जर ही परवानगी मिळाली तर ही सर्वात जुनी टेलिकॉम कंपनी विदेशी कंपनी बनेल. कारण एफडीआयनंतर भारती टेलिकॉममध्ये विदेशी शेअर्सचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक होईल.

सिंगापूरची सिंगेटेल आणि अन्य परदेशी कंपन्यांमधून गुंतवणूक करण्यास मंजुरी मिळावी यासाठी भारती एअरटेलने विनंती केली आहे. याच महिन्यात दूरसंचार विभागाकडून ही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

– भारती एअरटेलमध्ये सुनील भारती मित्तल आणि त्यांच्या कुटुंबाची 52 टक्के भागीदारी आहे. भारती टेलिकॉमजवळ एअरटेलचे 41 टक्के शेअर आहेत, तर विदेशी प्रमोटर होल्डिंग 21.46 टक्के आहे. सुमारे 37 टक्के शेअर सामान्य गुंतवणूकदारांजवळ आहेत.

– सध्या भारती एअरटेलमध्ये परेदशी गुंतवणूक 43 टक्के आहे. भारती टेलिकॉम कंपनीची मालकी जर परदेशी कंपन्यांकडे गेली तर भारती एअरटेलमध्ये परदेशी हिस्सा 84 टक्के होईल.

आपली प्रतिक्रिया द्या