‘भाऊ’ राक्षस बनणार, लवकरच मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात होणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रा रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागल्याने लॉकडाऊनचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला होता. लॉकडाऊन काळात काही निर्बंध घालण्यात आले होते, या निर्बंधांमुळे मराठी मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यात करण्यास सुरुवात झाली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कठोर परीश्रमामुळे आणि कडक निर्बंधांमुळे रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्य शासनाने निर्बंध थोडे शिथील करायला सुरुवात केली. शिथील केलेल्या निर्बंधांअंतर्गत मुंबईत पुन्हा चित्रीकरणास परवानगी मिळाली आहे. चित्रीकरण करत असताना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. निर्बंध शिथील झाल्याने जयपूरमध्ये सुरू असलेलं ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेचं चित्रीकरण आता मुंबईत करण्यात येणार आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

‘चला हवा येऊ द्या’चे जयपूरमध्ये चित्रीकरण होत असताना निलेश साबळे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे हे काही कारणाने जाऊ शकले नव्हते. मुंबईतील चित्रीकरणासाठी हे तिघेही परतले असून चला हवा येऊ द्याचे जुने आणि नवे विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी भागात भाऊ राक्षस बनून प्रेक्षकांना हसवणार आहे, तर सागर कारंडे पोस्टमन काकाच्या भूमिकेत परत दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या