36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपली राष्ट्रीय तलवारबाजी जेतेपदाची हॅटट्रिक साकारण्यासाठी ऑलिम्पियन तलवारबाज भवानी देवी थेट फ्रान्समधून गुजरातमध्ये येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक पटकावण्याचे केरळच्या भवानीचे स्वप्न आहे. गेली दोन वर्षे भवानीदेवी चॅम्पियन केरळचे प्रतिनिधित्व करीत आहे. आता यंदा ती तामीळनाडू संघातून खेळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला गुजरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा लाभ होणार हे असे ऑलिम्पियन तलवारबाज भवानी देवीने सांगितले.