दादा खानोलकर मार्कर्स टेनिस स्पर्धा – भावेश- विजय गिरीने मारली बाजी

शिवाजी पार्क जिमखाना (एसपीजी) आयोजित सातव्या दादा खानोलकर मार्कर्स आणि सहायक प्रशिक्षक टेनिस स्पर्धेत मुंबईच्या भावेश नवलू आणि विजय गिरी जोडीने मंगेश मांगेला-अक्षय मांगेला जोडीचा
6-1 असा सहज पराभव करीत बाजी मारली.

 लहान थोरांना टेनिसचे मार्गदर्शन करणाऱया मार्कर्स आणि सहायक प्रशिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसपीजीच्या टेनिस विभागाच्या संजय पटेल आणि योगेश परुळेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केल्या जाणाऱया या स्पर्धेला संजीव खानोलकर आणि एसपीजीच्या व्यवस्थापकीय समितीचा पाठिंबा लाभला. 40 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या स्पर्धेचा लौकिक मार्कर्सची विम्बल्डन असा झाल्यामुळे यंदा हिंदुस्थानातील
270 मार्कर्स कोर्टवर उतरले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संकेत खानोलकर, अमरेंद्र कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

.