भविष्य़…. शुभ श्रावण

147

मानसी इनामदार

समस्या – घरात सतत समस्या निर्माण होत असतील, विशेषतः पती-पत्नींमध्ये वाद, भांडणं होत असतील तर…

तोडगा – घराच्या प्रत्येक कोपऱयात रात्री वाटीत काळे मीठ ठेवा. सकाळी वाहत्या पाण्यात टाकून द्या. प्रभाव जाणवू लागेल.

 मेष – चांगले घडेल

विनाकारण स्वतःबद्दल चुकीचे शब्द उच्चारूही नका. स्वतःबद्दल केवळ चांगले विचारच मनात आणा. त्यातूनच पुढे अनपेक्षित चांगले घडणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. नातेसंबंध सांभाळा. तुमच्यातील लहान मूल जागे होईल. थोडे स्वतःचे लाड करा. पांढरा रंग शुभ ठरेल. शुभ आहार…खीर, श्रीखंड

वृषभ – गुंतवणूक फायदेशीर

खूप काही चांगले घडण्याचा अद्भुत आठवडा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरातल्यांचा छान पाठिंबा लाभेल. बढतीचे योग आहेत. आर्थिक लाभही चांगला होईल. पण जवळच्या माणसाकडून उपद्रव होईल. आकाशी रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः परदेशी भाज्या, कोशिंबीर

मिथुन – यश आणि आनंद

तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. मनाला टोचत असलेला विषाद काढून टाका. आवडीचा जोडीदार मिळेल. त्यामुळे सगळे जग सुंदर वाटू लागेल. आर्थिक गुंतवणूक योग्य जागी करा. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे. शेंदरी रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः आवडीचे गोड पदार्थ

कर्क – आराम करा

बऱयाच काळापासून तुम्ही स्वतःला कामाला जुंपून घेतले आहे. त्यामुळे ती गेलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी हा अगदी योग्य कालखंड आहे. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. त्यामुळे मनास समाधान मिळेल. या आठवडय़ात सुट्टी घेऊन आराम कराल. जांभळा रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः ऊर्जायुक्त पदार्थ, कर्बेदके

सिंह – छोटासा सोहळा

बऱयाचशा इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. त्यामुळे खुश राहाल. अनपेक्षित जबाबदारी अंगावर पडतील. यशस्वीपणे पार पाडाल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल. पाहुण्यांचे स्वागत कराल. छोटासा सोहळा साजरा होईल. निळा रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः राजगिरा, नाचणी, गव्हाचे सत्त्व

कन्या – प्रसन्नता लाभेल

तुम्ही अत्यंत चाणाक्ष आहात. त्याचा फायदा तुम्हाला व्यवहारात होईल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. पैशाचा अपव्यय टाळा. आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यामुळे प्रसन्नता लाभेल. मुलांची छोटीशी प्रगतीही मनास सुखावणारी असेल. तपकिरी रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः ताजी फळे, केळी

तूळ – मुलांचा पाठिंबा

घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहार आणि वायदे यांच्यात योग्य ताळमेळ राखा. नातेवाईकांमुळे तुम्ही काहिसे त्रस्त व्हाल. पण काळजी करू नका. त्यावर तुम्ही मात द्याल. घरातील मुलांचा पाठिंबा लाभेल. त्यामुळे मनास समाधान मिळेल. लाल रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः सुकामेवा, बदामाचे दूध

वृश्चिक – वरिष्ठांचे कौतुक

प्रदीर्घ आजारापासून सुटका. लाभदायक आठवडा. सरकारी कामातून लाभ होतील. घरात सुधारणा करून घ्याल. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांची साथ लाभेल. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील. वरिष्ठांचे कौतुक मिळवाल. चंदनाची माला जवळ ठेवा. ऑफ व्हाईट रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः खिचडी, ताकाचे पदार्थ

धनु – भावंडांची साथ

या आठवडय़ात केलेली गुंतवणूक समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेस पूरक ठरेल. शीघ्रकोपी स्वभावाला आवर घाला. भावंडांची साथ या आठवडय़ात मोलाची ठरेल. त्यामुळे महत्त्वाची कामे उरकून घ्याल. जोडीदाराचे लाड पुरवाल. त्यामुळे प्रेम वाढेल. अबोली रंग जवळ बाळगा.शुभ आहार ः बासुंदी, बेसनाचे पदार्थ

मकर – कामात बदल

अनावश्यक विचारांना मनात अजिबात थारा देऊ नका. मानसिक आरोग्य सांभाळा. दूरचे प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. अतिजवळीक साधणाऱया अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा. त्यातून नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या पथ्यावर पडणारा बदल होईल. राखाडी रंग महत्त्वाचा. शुभ आहार ः आवडीचे पदार्थ

कुंभ – इप्सित साध्य

आईने केलेली मदत खूप महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नातेवाईक, मित्रमंडळी अचानक घरी येतील. महिला वर्गाची धावपळ होईल. शिवशंकराची उपासना करा. कामात यश मिळेल. इप्सित साध्य होईल. पांढरा रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः दही, दूध, लोणी

मीन – मनाची शक्ती

नसते आजारपण मागे लागेल. पण तुमच्या मनाच्या शक्तीने त्यावर मात द्याल. आर्थिक लाभ होतील. पण पैसे जपून खर्च करा. सभा संमेलने गाजवाल. लेखकांना यशदायी आठवडा. वाचा, चिंतनात कमी पडू नका. लेखनाचे काwतुक होईल. भगवा रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः मत्स्याहार

 

आपली प्रतिक्रिया द्या