पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी! गृहिणी असलेल्या महिलेची कमाल

87

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानकडून पॉवर लिफ्टिंग या क्रीडाप्रकारात सहभाग घेणाऱ्या भावना टोकेकर यांनी एक दोन नव्हेत तर चक्क चार सुवर्ण पदकं कमावण्याचा पराक्रम केला आहे. नुकत्याच रशिया येथे पार पडलेल्या ओपन एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये चार विभागांमध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत.

भावना टोकेकर यांनी 65 किलो वजन असूनही 68 किलोच्या वजनी गटात सहभाग घेताना त्यांनी चार विभागात सुवर्ण पदकं जिंकली. स्क्वॉट प्रकारात 85 किलो, बेंच प्रकारात 62.5 किलो आणि डेडलिफ्ट प्रकारात 120 किलो इतकं वजन उचलत त्यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. कधीकाळी पूर्णवेळ गृहिणी असलेल्या भावना या हिंदुस्थानच्या वायुदलातील ग्रुप कॅप्टन श्रीपाद टोकेकर यांच्या पत्नी आहेत. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी करिअरवर पाणी सोडलेल्या भावना यांनी पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भाग घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी मोहम्मद अझमत यांच्याकडे पॉवर लिफ्टिंगचे धडे गिरवले.

या सगळ्यामध्ये पती, कुटुंब आणि मित्रमंडळींनी संपूर्ण पाठिंबा दिल्याचं भावना यांचं म्हणणं आहे. आता आशियाई स्पर्धांनंतर भावना पॉवरलिफ्टिंगच्या जगज्जेतेपदाची लढत देण्यासाठी सज्ज होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या