भय्यूजी महाराजांच्या हातूनच मोदी आणि अण्णांनी सोडलं होतं उपोषण

31

सामना ऑनलाईन । इंदुर

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर साऱ्या देशात अत्यंत खळबळ उडाली आहे. त्यांच्या अचानक जाण्यानं अध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज हे अत्यंत संयमी जीवन जगणारे व्यक्ती होते. सामाजिक कार्यामुळे त्यांची ओळख महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये होती. देशपातळीवर त्यांचं काम सुरू होतं. मात्र देश पातळीवरील प्रसिद्धीपासून ते दूर राहिले. पण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन छेडले, जनतेच्या मागण्यांसाठी ते उपोषणाला बसले. तेव्हा अण्णांची समजूत काढण्यासाठी म्हणून भय्यूजी महाराज यांचं नाव पुढे आलं. अण्णा हजारे यांच्या कार्यामुळे ते अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांच्यात अनेकदा चर्चा व्हायची. त्यामुळेच अण्णांनी उपोषण सोडावं म्हणून तत्कालिन सरकारनं भय्यूजी महाराज यांना विनंती केली होती.

bhayyuji-maharaj-anna-hazar

यानंतर देशातील मीडियासमोर त्यांच नाव आलं पुन्हा एकदा पुढे आलं ते गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या सद्भावना उपवासावेळी. आपला उपवास सोडवण्यासाठी मोदी यांनी देशातील संतांना आमंत्रित केलं होतं. यावेळी भय्यूजी महाराज यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. मोदींनी भय्यूजी महाराजांच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या