मोठी बातमी: भय्यूजी महाराजांची आत्महत्या

185

सामना ऑनलाईन । इंदूर

राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांनी इंदूर येथे गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती हाती आली आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

धर्मरक्षणासाठी,समाजहितासाठी भय्यूजींनी केला आर्थिक संकटाशी मुकाबला

कोण आहेत भय्यूजी महाराज?

भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख असं असून त्यांचे वय ४८ वर्षे इतके आहे. इंदूरमधल्या बापट चौकातील चौकामध्ये त्यांचा प्रसिद्ध आश्रम आहे. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नी माधवी यांचे निधन झाले आहे. कुहू असं त्यांच्या मुलीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी भय्यूजी यांनी दुसरे लग्न केले होते.

भय्यूजी महाराजांच्या हातूनच मोदी आणि अण्णांनी सोडलं होतं उपोषण

भय्यूजी महाराज हे आध्यात्मिक गुरू असून त्यांची राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चांगली ओळख होती. चित्रपटक्षेत्र तसेच उद्योगक्षेत्रामध्ये देखील त्यांची बड्या मंडळींशी चांगली ओळख होती. या क्षेत्रातील अनेकजण त्यांचे भक्त होते, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सातत्याने त्यांच्याकडे येत असायचे.

वाचा: भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येवर गडकरींची प्रतिक्रिया

आपली प्रतिक्रिया द्या