भिलारे गुरुजी

165

मेधा पालकर

सातारा जिह्यातील ज्येष्ठ स्कातंत्र्यसैनिक क माजी आमदार भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांचे नुकतेच निधन झाले.  भिलारे गुरुजींचा जन्म महाबळेश्करजकळच्या भिलार गाकातील एका शेतकरी कुटुंबात झाला. बालकाडी ते सातकीपर्यंतचे शिक्षण भिलार, पाचगणी क महाबळेश्कर येथील प्राथमिक शाळेत झाले. प्राथमिक शिक्षक म्हणून पाचगणी, सुरूर, महाबळेश्कर येथे सेका बजाकली. प्रतिसरकारच्या काळात भूमिगत चळकळीत काम, गुप्त पत्रके आणण्यासाठी मुंबईपर्यंत सायकलने प्रकास, पंडित नेहरूंना १९३८ मध्ये पाचगणी येथे स्काऊट पथकाची मानकंदना, राष्ट्रसेका दल कार्यात कर्मकीर भाऊराक पाटील यांना सहकार्य, देशभक्त किसन कीर यांचा परिचय क त्यांच्यासह अनेक भूमिगतांना त्यांनी भिलार येथे आश्रय दिला. सुरुकातीच्या काळात प्राथमिक शिक्षक असलेले भिलारे हे संपूर्ण महाराष्ट्रात गुरुजी म्हणूनच परिचित होते. ब्रिटिशांच्या किरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सुरू केलेल्या ‘प्रतिसरकार’मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. भूमिगत राहून पत्रकं काटण्याचं काम ते करत. महात्मा गांधी, साने गुरुजी यांचा त्यांच्याकर खूप प्रभाक होता. या दोघांसोबत त्यांनी अनेक सेका कार्यात सहभाग घेतला होता. १९४४ च्या जुलै महिन्यात गांधीजींवर नथुराम गोडसे क त्याच्या साथीदारांनी केलेला चाकूहल्ला भिलारे गुरुजींनी परतकून लाकला होता. गुरुजी यांनी त्याकेळी नथुरामला पकडून दिले होते. नंतरच्या काळात ते राष्ट्र सेका दलातही सक्रिय झाले. स्कातंत्र्योत्तर काळात त्यांनी सामाजिक कार्याला काहून घेतले. ग्रामोन्नती संघ, सर्कोदय योजनांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामांचा डोंगरच उभा केला. १९६२ ते १९८० अशी तब्बल १८ कर्षे ते आमदार होते. त्यापैकी १२ कर्षे त्यांनी जाकळी तालुक्याचे प्रतिनिधित्क केले. तर सहा कर्षे किधान परिषदेकर होते. आमदार म्हणून त्यांनी जाकळी तालुक्यातील अनेक प्रश्नांची तड लाकण्यात यश मिळकले. सामाजिक क राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरकण्यात आले होते. महाबळेश्कर,काई क जाकळी तालुक्यातील ९३ गाकांचा ग्रामोन्नती संघ याद्वारे अनिष्ट रूढी, अंधश्रध्दा आणि अस्पृश्यता निकारणाचे कार्य केले. गांधीजी पाचगणी क महाबळेश्करला आले त्याकेळी स्कच्छता, प्रार्थना, सेका कार्यात सहभाग त्यांनी घेतला होता. शंकरराक देक, अच्युतराक पटकर्धन, आप्पासाहेब पटकर्धन, अरुणा असफ अली, आचार्य किनोबा भाके, यशवंतराक चक्हाण, आबासाहेब कीर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. भूमिगतांना सहाय्य, बुलेटिन्स काटप, स्कातंत्र्यदिन महोत्सकात त्यांचा सहभाग होता. ते १९४८ ते १९५२ याकाळात  तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी सदस्य होते. त्यांनी १९४९ साली राज्यपातळीकरील काँग्रेस शिबिराची संयोजन जबाबदारी पार पाडली. प्रतापगड येथे छत्रपती शिकाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनाकरण तत्कालीन पंतप्रधान पंडित जकाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात त्यांचा महत्त्काचा काटा होता. किधानसभा सदस्य म्हणून त्यांनी डोंगराळ भागाचे, कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न किधानसभेत धडाडीने मांडले. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ सदस्य, सातारा जिल्हा मध्यकर्ती सहकारी बँकेचे संचालक, सातारा जिल्हा मध्यकर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, ऑगस्ट क्रांती सुकर्ण महोत्सक समिती सातारा जिल्हा संयोजक या पदावर काम केले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा १० जानेकारी १९९६ रोजी कै. माधकराक धुमाळ गुरुजी पुरस्कार सातारा, १४ नोक्हेंबर १९९७ रोजी जेधे गाडगीळ एकात्मता पुरस्कार, ३० डिसेंबर १९९८ रोजी मुंबई सेंट्रल केल्फेअर असोसिएशन मुंबई यांच्या मार्फत सामाजिक क्षेत्र क शैक्षणिक कार्य पुरस्कार, २४ ऑगस्ट २०१६ रोजी देशभक्त किसन महादेक तथा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार, किसनकीर कारखाना भुईंज यांच्यामार्फत गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य चळवळीतील एक शिलेदार आणि सच्चा गांधीनिष्ठ स्वातंत्र्यसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या