न्यायालयाचे आदेश धुडकावून चंद्रशेखऱ आझाद आंदोलनात सहभागी

656

भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याने न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत नागरिकत्व कायद्याविरोधात जामा मशिदीजवळ सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे आझादला पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चंद्रशेखऱ आझाद याला बुधवारी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यावेळी न्यायालयाने आझादला जामा मशीद तसेच दिल्लीत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी न होण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच पुढिल चार आठवडे दिल्लीबाहेर राहण्याची ताकिद देखील त्याला देण्यात आली होती. मात्र त्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता जामा मशिदीजवळ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला. तिथे त्याने संविधानाचे वाचन देखील केले.

न्यायालयाचे आदेश धुडकावन्याबाबत विचारले असता त्याने आपल्याला अशा प्रकारच्या आदेशाचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे त्याने सांगितले. ‘मला न्यायालयाच्या कोणत्याही अटीशर्तींचे, आदेशाचे पत्र देण्यात आलेले नाही. लोकशाहीत कुणालाही आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार असतो. त्यामुळे मी आंदोलनात सहभागी व्हायला आलो आहे’, असे आझाद याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या