रविदास मंदिर तोडफोड प्रकरण : हिंसाचारानंतर भीम आर्मीच्या ‘रावण’सह 96 जणांना अटक

551

दिल्लीतील तुगलकाबाद येथील रविदास मंदिर पाडल्याचे प्रकरणी बुधवारी रात्री पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. या हिंसाचाराच 15 पोलीस जखमी झाले असून शेकडो गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दंगल भडकावणे, सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी आतापर्यंत 96 लोकांना अटक करण्यात आली आहे. यात भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण याचाही समावेश आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

तुगलकाबाद येथील रविदास मंदिर पाडल्यानंतर दलित समाज आक्रमक झाला आहे. बुधवारी दलित समाजाच्या लोकांनी रामलीला मैदानात आंदोलन करेले. या आंदोलनात भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखरही हजर होता. दिल्ली सकरामधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचीही येथे उपस्थिती होती. पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील दलित समाज आंदोलनासाठी एकत्र जमला होता. शांततेत सुरू असलेल्या आंदोलन अचानक हिंसक झाले.

रामलीला मैदानावरील आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो दलित समाजांच्या लोकांनी तुगलकाबादमध्ये तुफान दगडफेक केली. यादरम्यान 15 पोलिसांसह अनेक लोक जखमी झाले. आंदोलनकर्त्यांनी गाड्यांची तोडफोडही केली. आंदोलन हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसेच हवेत गोळीबार करून गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसह निमलष्करी दलही पाचारण करण्यात आले असून तुगलकाबादला छावणीचे स्वरुप आले आहे.

delhi-ravidas-temple

दरम्यान, दंगड भडकावणे, तोडफोड प्रकरणी गोविंदपुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 96 लोकांना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या