गौतम नवलखा यांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात पुन्हा धाव; आज सुनावणी

363
gautam-navlakha

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर नवलखा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर उद्या गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून गौतम नवलखा यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला, परंतु 11 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. ही मुदत संपत आल्याने त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंधर यांनी तो जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आपल्याला अटक होऊ नये यासाठी गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला.

आपली प्रतिक्रिया द्या