‘एल्गार’ची समांतर चौकशी करणार, गृह विभाग स्थापन करणार एसआयटी

250

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला तरीही राज्याच्या गृह विभागाच्या माध्यमातून एसआयटीमार्फत समांतर तपास व्हायला हवा. एनआयए कायद्याच्या सेक्शन 10 मध्येच याबाबत तरतूद आहे. त्यामुळे समांतर चौकशी करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी दिली.

राष्ट्रकादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशकंतराक चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीविषयीची माहिती नवाब मलिक तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. केंद्राने कोरेगाव-भीमाचा एनआयएकडे तपास सोपविला असला तरी एसआयटीमार्फत तपास करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतदेखील आपण चर्चा करणार आहोत. एनआयए कायद्याच्या कलम 10 नुसार समांतर चौकशी करण्याचा अधिकार राज्याला असतो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या