भीमा कोरेगाव हिंसाचार – वरवरा राव यांना जामीन मंजूर

भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या वरवरा राव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. राव यांना 2018 साली अटक करण्यात आली होती.न्यायमूर्ती यु.यु.लळित आणि एस.रविंद्र भट यांच्या खंडपीठापुढे राव यांच्या जामिनासंदर्भातील याचिका सुनावणीसाठी आली होती. या खंडपीठाने राव यांना जामीन देताना म्हटले आहे की , ‘ आरोप निश्चिती करण्यासाठी प्रकरण हाती घेण्यात आलेले नाही. या खटल्यातील आरोपींनी दाखल केलेल्या गुन्हे रद्द करण्याच्या याचिकाही प्रलंबित आहेत. राव यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही, त्यामुळे जामीन मागे घेण्यात आला. त्यामुळे पी वरावरा राव यांना वैद्यकीय कारणामुळे जामिनासाठी पात्र आहेत.

राव यांना जामीन देताना न्यायालयाने खालील मुद्दे ध्यानात घेऊन आदेश दिला आहे

  • राव यांचे वय 82 वर्षे आहे
  • तपास यंत्रणांना कोठडीतील चौकशीसाठी 2018 पासून पुरेशी संधी होती
  • आरोपपत्र दाखल केले असले तरी या खटल्यातील काही आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत.
  • राव यांच्या प्रकृतीत गेल्या काही महिन्यांपासून सुधारणा दिसून आलेली नाही.