एल्गार आणि भीमा कोरेगाव वेगळे विषय, दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

558
CM uddhav-thackeray

राज्यात एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव या विषयांवरून सध्या चर्चांना उधाण आले आहे. काहीजण यासंदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आणि हे दोन्ही विषय वेगळे असून दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

“एल्गार आणि भीमा कोरेगाव हे दोन वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवांचा जो विषय आहे तो भीमा कोरेगाव बद्दल आहे आणि त्याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणार नाही आणि मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही.” असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या