कोरेगाव-भीमा प्रकरण एनआयएचे पथक पुण्यात दाखल

440

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक सोमवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. या आठ सदस्यीय पथकाने कोरेगाव-भीमा हिंसाचार व एल्गार परिषदेचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांतील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास विशेष तपास पथकामार्फत केला जावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने या संवेदनशील प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे सोपवली. हा निर्णय म्हणजे राज्य सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रकार असल्याची टीका होऊनही केंद्राने नरमाई घेतली नाही. त्यामुळे एनआयएच्या पथकाने सोमवारी सकाळी पुणे गाठून तपासाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू केली.

आपली प्रतिक्रिया द्या