अक्षय कुमारचा सिनेमा ‘भूल भुलैया’ 2007मध्ये टायटल ट्रॅक येताच म्युझिक चॅनलवर चांगलेच गाजले होते. त्यावेळी प्रत्येकाच्या हातात युट्युब आणि फोनमध्ये म्युझिक अॅप्स आजच्या सारखे पॉप्युलर नव्हते. आता गाणे ऐकण्याचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे, मात्र या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे.
‘भूल भुलैया 3’ थिएटर्समध्ये प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे आणि कार्तिक आर्यन असलेल्या या सिनेमाचा टायटल ट्रॅक आला आहे. प्रीतम यांनी कंपोज केलेले गाणे यावेळीही हटके झाले आहे. गायक नीरज श्रीधरच्या आवाजासोबत यावेळी गाण्यात दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांची एण्ट्री झाली आहे. यावेळी ‘भूल भुलैया 3’ च्या मूळ गाण्याला नीरज श्रीधर तसेच हिंदुस्थानचा स्वतःचा आंतरराष्ट्रीय संगीतकार दिलजीत दोसांझचा आवाज आहे आणि ‘मिस्टर वर्ल्डवाइड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅपर पिटबुलने या गाण्यात रॅप केला आहे.
गाणे सुरु होताच क्षणी ‘भूल भुलैया’ च्या आयकॉनिक बीट्स ऐकू येतात. आपल्या रॅपमध्ये दिल्लीपासून पुण्यापर्यंत हॅण्ड्स अप करुन थिरकण्यासाठी पिटबुल याचा रॅप मजेदार वाटेल आणि त्यानंतर दिलजीत दोसांझच्या आवाजाने सहज थिरकायला होणार आहे. कार्तिक आर्यनने यावेळी भन्नाट डान्स केला आहे. ‘भूल भुलैया 3’ ट्रेलर प्रेक्षकांना मनोरंजक आहे. यावेळी सिनेमामध्ये कार्तिकसोबत विद्या बालन आपल्या मंजुलिका अवतारात पुन्हा दिसणार आहे. या दोघांसोबत माधुरी दिक्षित आणि तृप्ती डिमरीही दिसणार आहे.