अभ्यास केला नाही, मुलीला 168 वेळा कानाखाली मारण्याची विद्यार्थ्यांवर शिक्षकाची जबरदस्ती

सामना ऑनलाईन। भोपाळ

मध्य प्रदेशमधील झाबुआ येथे अभ्यास न केल्याने एका माथेफिरू शिक्षकाने विद्यार्थीनीला अजब शिक्षा दिली. त्याने या विद्यार्थीनीला दररोज कानाखाली मारण्याची शिक्षा दिली, या मुलीला वर्गातल्याच विद्यार्थ्यांनी कानाखाली मारायचे अशी जबरदस्ती या शिक्षकाने केली. अशाप्रकारे तिला तब्बल 168 वेळा कानाखाली मारण्यात आली. याबद्दल या मुलीने पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

झाबुआमधल्या सरकारी शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शिवप्रताप सिंह यांची यांची मुलगी आहे. 11 जानेवारीला शाळेतील शिक्षकाने तिला गृहपाठ करून येण्यास सांगितले. पण तब्येत बरी नसल्याने ती गृहपाठ न करताच शाळेत गेली. नेहमीप्रमाणेच वर्गशिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी तिला अभ्यासाबद्दल विचारले असता आपण गृहपाठ केला नाही असे सांगितले. यामुळे चिडलेल्या शिक्षकाने तिच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिला रोज एक कानाखाली मारण्याची शिक्षा दिली. या विद्यार्थिनीला गेले पाच महिने वर्गातील मुलं कानाखाली मारत होती. अखेर हा अपमान सहन न झाल्याने तिने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या वडीलांनी शिक्षक मनोज कुमार वर्मा याच्याविऱोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. याबद्दल कळताच शिक्षकाने गावातून पळ काढला,पण मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली.