भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

भोसरी मतदारसंघाचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. आमदार लांडगे हे गेल्या आठवडाभरात प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांशी संपर्कात आले होते. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.

आठ दिवसांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचा संपर्क आला होता. लांडगे यांच्या संपर्कात आलेल्या ’हायरिस्क कॉन्टॅक्ट’मधील 128 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या