गुजरात मासिक पाळी प्रकरण – प्राचार्यासह दोन कर्मचारी निलंबीत

515

गुजरातच्या भूजमध्ये एक संतापजनक घटना घडली होती. मासिक पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी विद्यार्थिनींचे कपडे उतरवले होते. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्य, हॉस्टेलच्या रेक्टर आणि एका चतुर्ण श्रेणीच्या कर्माराच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थींनी आंदोलनही केले होते.

भूज पोलिसांनी या तीन व्यक्तींसह अनीता या महिलेच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा कॉलेजशी संबंध नाही. चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच महिला आयोग्याच्या सात सदस्यांनी कॉलेजला भेट दिली होती. तसेच पीडित विद्यार्थिनींची चर्चाही केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या