निफाडच्या विंचूर येथे आपल्या भाषणात व्यत्यय येत असल्याने ‘हनुमान चालीसाचा आवाज जरा कमी करा’, असा आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांना दिला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उलटसूलट चर्चा सुरू आहे.
विंचूर येथे रस्ते विकास कार्यक्रमावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण सुरू होते. जवळच असलेल्या मंदिरातून हनुमान चालीसाचा आवाज येत होता. आपल्या भाषणात व्यत्यय येत असल्याची भावना भुजबळांची झाली. ‘इथे असलेल्या पोलीस इन्स्पेक्टरने हनुमान चालीसाचा आवाज जरा कमी करावा’, असा आदेशच त्यांनी दिला. यानंतर हा आवाज बंद झाला, त्याबद्दल त्यांनी मंदिर प्रशासनाचे आभार मानले. ‘मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे, त्याच्याच हाती सगळं आहे, परमेश्वर आपल्या सर्वांना शक्ती, बुद्धी आणि युक्ती देवो’, अशी सारवासारव भुजबळ यांनी केली.