हुड्डा यांचे शक्तिप्रदर्शन, हरयाणात काँग्रेस फुटीच्या मार्गावर?

303

हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक तोंडाकर असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने हरयाणात काँग्रेस फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस भरकटलीय अशी टीका करीत हुड्डा यांनी रोहतकमध्ये एका रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन केले.

हुड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कलम 370 बाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेचाही समाचार घेतला. आता पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही असे सांगतानाच कलम 370 हटवण्यास माझा पाठिंबा होता. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा त्याला विरोध होता, असे हुड्डा म्हणाले.

भूमिपुत्रांना 75 नोकऱ्या
आम्ही सरकारमध्ये आलो तर आंध्र प्रदेशसारखा कायदा बनवू, भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देऊ, मी मुख्यमंत्री झालो तर माझ्या मंत्रिमंडळात चार उपमुख्यमंत्री असतील असे हुड्डा म्हणाले. याकेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपने बेरोजगारी, दंगली आणि असहिष्णुता निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या