10 दिवस व्हेंटिलेटरवर…एक महिन्याच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले संक्रमित होताना दिसत आहेत. ओडिशामध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या एक महिन्याच्या चिमुकलीने 10 दिवस व्हेंटिलेटरवर राहून कोरोनावर मात केली. भुवनेश्वरच्या एका खासगी रुग्णालयात या नवजात मुलीवर कोरोनाचे उपचार सुरू होते.

दोन आठवडय़ांपूर्वी या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला कालाहांडीहून भुवनेश्वर येथे उपचारासाठी आणण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच तिला व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू करण्यात आले. रेमडेसिवीर, स्टिरॉइड आणि विविध प्रकारचे उपचार करण्यात आले. आता ही मुलगी कोरोनातून पूर्णपणे बरी झाली असून लवकरच तिला रुग्णालयातून घरी पाठविण्यात येईल, असे डॉ. अरिजीत महापात्रा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या