भुवनेश्वरला ‘या’ अभिनेत्रीसोबत बेटावर फिरायला जायचंय

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रिकेटपटू आणि सिने अभिनेत्री यांच्या जोड्या कायमच चर्चेचा विषय ठरतात. विराट आणि अनुष्काची सर्वात हिट आणि हॉट ठरत असताना आता हिंदुस्थानचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं नाव देखील चर्चेत आलं आहे. भुवनेश्वर कुमारनं कळत नकळत आपल्या आवडत्या अभिनेत्रीचं नाव घेतलं आणि तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

shraddha-kapoor

झालं असं की, एका कार्यक्रमादरम्यान महिला अँकरनं भुवनेश्वरला प्रश्न टाकला. इतरांना गुंगारा देणारा चेंडू टाकणाऱ्या भुवनेश्वरसाठी हा प्रश्न गुगली ठरला. ‘समजा एखाद्या बेटावर तू तीन लोकांसोबत उभा आहेस तर ती लोकं कोण असतील?’, असा प्रश्न विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, रवी शास्त्री, श्रद्धा कपूर आणि धोनी. भुवनेश्वरच्या या उत्तरात श्रद्धा कपूरचं नाव आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून श्रद्धा कपूरचा हा ‘फॅन’ आता सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

अर्थात हे फक्त भुवनेश्वरचं मत झालं पण श्रद्धाची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या