भाईंदर पूर्व येथे होम कॉरंटाईन केलेला रुग्ण रस्त्यावर दोन तास भटकला

871

भाईंदर पूर्व येथील काशी नगर परिसरात राहणारा मात्र परदेशातून आल्यामुळे सक्तीचे होम कॉरंटाईन केलेला एक रुग्ण काल रात्री तीन तास भाईंदर पूर्व परिसरातील रस्त्यावर निर्धास्त भटकला. सदर वृत्त शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकेला समजताच तिने याची माहिती तात्काळ पालिका आणि पोलिसांना दिली. त्याला पोलिसांनी अटक करून विलागिकरण कक्षात भरती केले आहे.

भाईंदर पूर्व येथील काशी नगर येथे राहणार एक युवक नुकताच परदेशातून आला होता. त्याला होम कॉरंटाईन करून तसा शिक्का त्याच्या हातावर मारला होता. मात्र या अतिशहाण्या इसमाने आपल्या हातावरील शिक्का मिटवून काल रात्री ९ ते ११ भाईंदर पूर्व परिसरात फिरला. या कालावधीत त्याने दूध आणि किराणा सामान भाजीपाला आदि साहित्य घेतले. ही घटना समजताच शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी ही माहिती पालिका आणि पोलिसांना आज सकाळी सांगितली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट येथील विलागिकरण कक्षात दाखल केले आहे. पोलिस आता त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या