परळी तालुक्यातील सोनहिवरा गावात बिबटा आढळल्याने भीतीचे वातावरण

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी तालुक्यातील सोनहिवरा गावात बिबट्या दिसल्याचे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनहिवरा गावाजवळ असलेल्या माळरानातून डोंगरदरीच्या दिशेने बिबटया गेल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने शोध घ्यायला सुरू केली असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले गेले आहे.

सोनहिवरा गावाच्या उत्तर दिशेला असलेल्या डोंगरावर शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास गावातील काही नागरिकांना वाघसदृष्य प्राणी दिसला आणि काही वेळातच गावात बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे नागरिकांत मोठी भिती निर्माण झाली.

या गावात बिबट्याचा वावर असल्याबाबत कोणत्याही खुणा दिसून आलेल्या नाहीत. कदाचित दुसरा एखादा प्राणी नागरिकांना दिसल्याची शक्यता अधिक आहे. वनविभागाच्यावतीने शोध घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बी. जी. कस्तुरे, वनपाल परळी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या