बीसीसीआय होणार मालामाल, ई-लिलावात ४४४२ कोटींपर्यंत बोली लागली

21
bcci-logo

सामना ऑनलाईन, मुंबई

आंतरराष्ट्रीय स्तरावरील धनाढय़ बोर्ड म्हणून ओळखले जाणाऱया बीसीसीआयच्या पेटीत आणखी धन जमा होणार आहे. मायदेशात पुढील पाच वर्षांसाठी आयोजित करण्यात येणाऱया क्रिकेट मालिकांच्या मीडिया प्रक्षेपण हक्कासाठी मंगळवारपासून ई-लिलावाद्वारे बोली लावण्यात आली असून पहिल्या दिवशी ४४४२ कोटींपर्यंत ती पोहोचली आहे. याआधी २०१२ साली ‘स्टार टीव्ही’ने ३८५१ कोटींची बोली लावत मीडिया हक्क विकत घेतले होते. मात्र आताच बोलीची रक्कम १५ टक्क्यांवर पोहोचली आहे. ‘स्टार’, ‘सोनी’ व ‘जियो’ या तीन कंपन्यांमध्ये हक्क मिळवण्यासाठी कमालीची चुरस लागली असून उद्या ११ वाजता पुन्हा प्रकियेला सुरुवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या