बिग बींनी पोस्ट केला विठ्ठलाचा फोटो

1595

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या अभिनेता अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर विठ्ठल आणि रुक्मिणीचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक भावनिक पोस्ट करीत सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यात त्यांनी ’ईश्वर के चरणों मे समर्पित’ असे लिहले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अमिताभ यांनी तब्बल सहावेळा हा फोटो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर गेल्या शनिवारपासून विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन सतत सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

बुधवारी त्यांनी विदुर नितीचा श्लोक पोस्ट केला होता. ज्यात नेहमी दुःखी राहणाऱया सहा लोकांबद्दल सांगण्यात आले आहे. या श्लोकानुसार त्यांनी सगळ्यांबरोबर ईर्ष्या, घृणा करणारे, असंतोषी, क्रोधी, नेहमी संशय घेणारे आणि लोकांच्या जीवावर जगणारे असे सहा प्रकारचे लोक नेहमी दुःखी असतात, अशा लोकांपासून सावध रहायला पाहिजे, असा त्याचा अर्थ होता.

आपली प्रतिक्रिया द्या