पाकड्यांना शिव्या देणारा ‘हिंदुस्थानी भाऊ’ बिग बॉसमध्ये जाणार?

2767

पाकड्यांना बेफाम शिव्या देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचा बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये समावेश होण्याची दाट शक्यता आहे. हिंदुस्थानी भाऊ हा प्रसिद्ध युट्युबर असून त्याचे युट्युबवर 9 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हिंदुस्थानविरोधात गरळ ओकणाऱ्यांचा हिंदुस्थानी भाऊ समाचार घेत असतो. देशाविरोधात बोलणाऱ्या तिथल्या नेटीझन्सना तो शिव्या देत राहातो. त्याची वाढती क्रेझ पाहून त्यालाही बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

बिग बॉससाठीचे स्पर्धक निवडण्यासाठीच्या निकषांमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्यांना या शोमध्ये संधी देण्याचं ठरवण्यात आल्याचं समजत आहे. यामुळेच हिंदुस्थानी भाऊचंही नाव चर्चेत आलं आहे. मराठी बिग बॉसमध्ये देखील अशाच पद्धतीचा प्रयत्न करण्यात आला होता. अभिजीत बिचुकले हा एक वेगळा चेहरा बिग बॉस मराठीमध्ये आणण्यात आला होता. हिंदुस्थानी भाऊशिवाय या शोमध्ये कोणाकोणाला संधी मिळण्याची शक्यता आहे ते पाहा या फोटो गॅलरीमध्ये.

Photo – या नावांची आहे Big Boss 13 साठी चर्चा

आपली प्रतिक्रिया द्या