बिग बॉसमधून पसरवला जातोय लव्ह जिहाद, नेटकऱ्यांनी फटकारले

2726

अभिनेता सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो वरून बऱ्याचदा वाद निर्माण झाले आहेत. कधी या शोमधून अश्लिलता पसरवल्याचा आरोप झालाय तर कधी हिंदुस्थानी संस्कृतीचा अनादर केल्याचे बोलले गेले आहे. त्यामुळे कायम वादात राहिलेला हा शो पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे.

सलमान खानच्या या शोमधून लव्ह जिहादला पसरवला जात असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. सध्या ट्विटरवर #जेहाद_फैलाता_bigboss हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. या ट्रेंडमधून अनेकांनी सलमान खानवर व बिग बॉसच्या निर्मात्यांवर जोरदार टीका केली असून अनेकांनी तर सलमान खानला अनफॉलो करण्यास देखील सुरुवात केली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसमध्ये एका कश्मीरी मुस्लीम तरुण मॉडेलला व एका हिंदू तरुणीला एकच बेड दिला आहे. तसेच त्या दोघांना एकत्र टास्क करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. कदाचित त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमाचा अँगल तयार होऊन टिआरपी वाढू शकतो शकतो असा निर्मात्यांचा प्लान असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सध्या बिग बॉसवर टीका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या