‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठी बिग बॉस कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले तसेच राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असलेले कलाकार अभिजित बिचुकले यांनी आपल्या सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. चेक बाऊन्स तसेच खंडणीप्रकरणी पोलिसांनी बिचुकले यांना बिग बॉसच्या सेटवरून अटक केली होती. सातारा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने बिचुकले यांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला असून लवकरच या अर्जावर सुनावणी होणार आहे.

चेक बाऊंन्स तसेच सात वर्षांपूर्वीच्या एका खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बिचुकले यांना सातारा पोलिसांनी मुंबईत बिग बॉसच्या सेटवरून 21 जून रोजी अटक केली होती. आपली सुटका व्हावी यासाठी बिचुकले यांनी सातारा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळत त्यांची तुरुंगात रवानगी केली. आता बिचुकले यांनी आपल्या सुटकेसाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या